सेवा हेच कर्तव्य!
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात झपाट्याने रुग्णवाढ झाली. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाच्या संसर्गाने अक्षरश: हाहाकार माजवला. संसर्गित रुग्णांच्या उपचाराबरोबरच लोकांचे जीव वाचवणे हे एक मोठे संकट उभे राहिले. सरकारी उपचार यंत्रणा अपुरी पडू लागल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी व्यवस्था उभारणे हे एक मोठे आव्हान ठरले. अशा वेळी समाजाप्रती असलेल्या सेवा कर्तव्याची जाणीव ठेवत भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या लढाईविरुध्द कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक,खासदार, आमदार यांनी विविध कोविड केअर सेंटर्स, आयसोलेशन सेंटर्स,लसीकरण केंद्र,ऑक्सिजनेटेड बेडस्, क्वारंनटाईन रुग्णांसाठी ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स मशीन्स अशा विविध सेवांच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे.
राज्याचे विरोधीपक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केंद्र सरकारशी समन्यव साधत राज्यातील रुग्णांना सर्वोतोपरी व्यवस्था मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली ज्यामुळे सद्यस्थितीत राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसारख्या औषधांचा सर्वाधिक साठा उपलब्ध होऊ शकला. निव्वळ केंद्र सरकारकडूनच नव्हे तर इतरही राज्यांकडून, खाजगी उद्योजकांकडून, राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत.